भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'सेवा पंधरवडा' अंतर्गत 29 सप्टेंबर रोजी चिखली नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ची माहिती जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी 'अंगीकार' अभियान-2025 राबवण्यात आले. या कार्यक्रमाचे आमदार श्वेता ताई महाले पाटील यांनी उद्घाटन करून उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही केंद्र सरकारची नवी योजना असून घरकुलाची जागा नियमानुकूल करण्यासह लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे, हक्काची जागा मिळावी या