मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे दिनांक 22 ऑगस्ट रोजी पोळ्याच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान शुल्कक कारणावरून गावात पाणीपुरी चालवणाऱ्या उत्तर प्रदेश येथील पाणीपुरीधारकाला देऊळगाव माळी येथील व वसुदेव मगर यांनी मारहाण केली. व मध्यस्थी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला सुद्धा मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली अशा तक्रारीवरून आरोपी वसुदेव मगर यांच्याविरुद्ध मेहकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.