तालुक्यातील अमडापूर येथे मन नदीपात्रात पाय घसरून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २ सप्टेंबर रोजी घडली. मृताचे नाव अरुण चिंधाजी वानखेडे (वय ३५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण वानखेडे हे कामानिमित्त बुलढाण्यात गेले होते. दुपारी काम आटोपून घरी परतताना ते नदीपात्रातील सिमेंटच्या सपाट रस्त्यावरून जात होते. मात्र, रस्ता शेवाळामुळे घसरडा झाल्याने त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात पडले. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला.