पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेवारी मटका बुकी अड्ड्यावर टाकलेल्या धाडीनंतर आज रविवार २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ पर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तब्बल अडीच तास कणकवली पोलीस ठाण्यात मटका रेड मधील आरोपी आणि काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली.