कामठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी *डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली आणि राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाधिक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.मोबाइल व्हॅनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात डॉ. तुषार डहाट डॉ. पलास गणवीर आणि डॉ. त्रिपाठी यांनी तपासणी केली.