अक्कलकोट तालुक्यातील वाढत्या पावसामुळे पूरस्थितीला तातडीने सामोरे जाण्यासाठी गळोरगी तलाव परिसरात आपदा मित्र पथकाला शुक्रवारी दुपारी 3 वाजता पूरबचावाचे प्रशिक्षण देण्यात आले. तहसीलदार विनायक मगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले व नायब तहसीलदार संजय भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बोट चालवणे, पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविणे, श्वसन नियंत्रण यांसारख्या प्रत्यक्ष उपायांचा सराव झाला. आपदा मित्र पथकात प्रवीणकुमार बाबर, जाकीर कागदे, प्रविण गुंजले आदी उपस्थित होते.