अतिवृष्टी! तरीही माघार नाही! पूरग्रस्त अहमदपूरकरांसाठी ' त्या' दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत! अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी पहाटेपर्यंत अतिवृष्टीचे स्वरूप धारण केले. मन्याड नदीसह तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक गावांचा अहमदपूर शहराशी असलेला संपर्क तुटला होता