आज दि एक सप्टेंबर सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर शहराच्या शैक्षणिक परिसरात ड्रग्जचा विळखा वाढत असल्याचे समोर आले आहे. सिटी चौक पोलिसांनी एका तरुणाला १५ ग्रॅम एमडी ड्रग्ज अटक केली. ही कारवाई काल रविवार रात्री साडे 12 वाजता मौलाना आझाद महाविद्यालयाच्या पाठीमागील पार्किंग गेट आणि होमगार्ड मैदानाजवळ करण्यात आली. शेख आमेर असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीकडून हे ड्रग्स आणले कुठून याची मुळे कुठली आहे याचा देखील तपास सिटी चौक पोलीस ठाणे आता करत आहे