हिंगणघाट मराठा आरक्षण संदर्भात काढलेल्या २ सप्टेंबर २०२५चा महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मराठा समाजाचे सरसकट ओबीसीकरण होत असल्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. या शासन निर्णयामुळे ओबीसीवर होत असलेला अन्याय दुर करुन हा शासन निर्णय मागे घ्यावा अशी मागणी ओबीसी संघर्ष समिती हिंगणघाटचे वतीने उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत शासनाकडे निवेदनातून केली आहे. यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.