चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती तालुक्यातील शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे. येलो मोॉक विषाणुजन्य रोग, खोडकिडा आणि मुळकुच (कॉलर रॉट) या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन पिकाची हजारो एकर शेती रोगराईच्या विळख्यात सापडली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली.