टिटवाळा येथील ब्रीजखाली बांधलेली चौकी कोणीतरी बेकायदेशीर पद्धतीने वापरत असल्याचा खुलासा टिटवाळा येथील समाजसेवक संदीप नाईक यांनी आज दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी १० सुमारास केला आहे. या संदर्भात बोलताना काहीही अनुचित प्रकार घडू शकतात अशी शक्यता नाईक यांनी वर्तवली आहे. तसेच टिटवाळा पोलिसाने याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.