एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यास किंवा रुग्णालयात भरती व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अशा व्यक्तीचा मृतदेह घरी नेण्याचा मोठा प्रश्न गरीब रुग्णांच्या नातेवाईकांसमोर उभा राहतो. अशावेळी शववाहिकेसाठी त्यांना मोठा खर्चही करावा लागतो. ही अडचण लक्षात घेता पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यात मृतदेहांची वाहतूक विनामुल्य आणि वेळेवर होण्यासाठी दहा शववाहिका मंजूर करून घेतल्या आहे.