चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर येथे जय दुर्गा स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन, गौरीपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य फुटबॉल स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेचे उदघाटन आज दि.१ सप्टेबंर सोमवार रोजी सकाळी १० वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ अशोक नेते तर उदघाटन आमदार डॉ मिलींद नरोटे यांचा हस्ते करण्यात आले.