दीपक केसरकर यांचे दोडामार्ग येथील बॅनर हटविल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहावयास मिळाले. यावेळे तालुकाध्यक्ष गणेशप्रसाद गवस यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका अधिकार्यांना घेराव घालून याचा जाब विचारण्यात आला. बॅनर का हटविले याची कारणे द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.