खुमारी शेत शिवारात येत असलेल्या एका शेतात फवारणी करण्यासाठी गेलेल्या राघो जेठीराम नारनवरे वय 38 वर्षे रा. सराखा बोर्डा या शेतमजुराचा जिवंत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. यानंतर मृतकाचे चुलत भाऊ संभा नारनवरे यांच्या तक्रारीवरून शेतमालक लीलाधर धानोरे याला या घटनेबाबत जबाबदार धरून त्याची विरुद्ध पोलीस कारवाई करण्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार रामटेक पोलिसांनी शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबरला सकाळी शेतमालक धानोरे यास अटक केली. यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.