गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले, त्यापैकी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर अवस्थेत होता त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.