उदगीर तालुक्यात रात्रभर संततधार पाऊस सुरूच असून नदी नाले,ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत,नदीने तर धोक्याची पातळी ओलांडली असून प्रशासनाने नागरिकांना नदी काठी जाऊ नये असे आवाहन केले आहे, वागदरी या गावाला लागून नदी असून नदीच्या पलीकडे स्मशान भूमी आहे,त्याच बरोबर शेती आहे,नदीला पूर आला तर अंत्यविधी करण्यासाठी नदीवर पूल नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे तसेच शेतीचे कामे करण्यासाठी नदीच्या पलीकडे शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठीही पुलाची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे