सोलापूर हद्दवाढ भागातील शेळगी परिसरातील नागरिकांसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंगळवारी दुपारी 1 वाजता महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. १९९२ साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण १३ गावे सोलापूर शहरात समाविष्ट झाली.