आज दि 12 सप्टेंबर सकाळी 9 वाजता लष्कराचा बनावट गणवेश वापरणाऱ्या एका महिलेला दौलताबाद पोलिसांनी अटक केली. रुचिका जैन असे तिचे आरोपी रुचिका. नाव असून तिच्या घरातून लष्करी साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.दौलताबाद परिसरातील धरमपूर येथील प्लॉट क्रमांक १६ येथे राहणारी रुचिका अजित जैन (४८) ही महिला लष्कराचा गणवेश वापरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे ११ सप्टेंबर रोजी पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात रुचिका जैन हिच्याकडून दोन प्रकारचे लष्करी गणवेश