जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठक घेतली खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती बैठकीचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री नामदार बाबासाहेब पाटील होते यावेळी अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांचे प्रश्न आणि समस्या मांडल्या त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली