विरार पश्चिमेकडील आगाशी येथील पोस्ट ऑफिस मागील तेरा महिन्यांपासून बंद करण्यात आले व ते विरार शहरात स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हाल प्रश्न सहन करावा लागत होत्या. खासदार डॉ. हेमंत सम्राट यांनी हे पोस्ट ऑफिस पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर हे पोस्ट ऑफिस पुन्हा एकदा सुरू करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते या पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना टपालसेवा बँक सुविधा विविध शासकीय सेवा यांचा लाभ घेण्यासाठी दूर जावे लागणार नाही.