भर पावसाची पर्वा न करता दारव्हा शहरात शुक्रवारी गोर बंजारा समाजाने एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढला. गोर बंजारा आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चातून समाजाचा प्रखर एल्गार नोंदवण्यात आला.मोर्चाची सुरुवात शिवाजी नगर येथील बंजारा भवनातून झाली. झाशी राणी चौक, बसस्थानक चौक, गोळीबार चौक या प्रमुख मार्गांवरून घोषणाबाजी करत मोर्चाने मार्गक्रमण केले. "एसटी आरक्षण आमचा हक्क आहे," अशा दम..