धुळ्यातील साक्री रोडवरील कृष्णाई हॉटेल येथे शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झाली. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा व बळ मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्व पदाधिकारी व बूथ समित्या एकत्र येऊन शिंदे गटाचा गड मजबूत करावा, भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन आबिटकर यांनी कार्यकर्त्यांना केले.