रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच एक अनपेक्षित प्रकार घडला... सजवलेला बैल अचानक फटाक्यांच्या आवाजामुळे बिथरला आणि उधळून पळाला... त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला आणि लोकांना जीव वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली... या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे...