शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी वरवंटी शिवारात वनविभागाकडून पिंजरा लावण्याचे काम सुरु धाराशिव तालुक्यातील वरवंटी शिवार परिसरात वाघाच्या हालचाली दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तत्काळ पिंजरा लावण्याचे काम सुरू केले आहे. ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क राहावे तसेच अनावश्यक हालचाल करू नये, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.