बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच स्व.संतोष अण्णा देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून,या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसने दोषींना फाशीची शिक्षा द्यावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून IPC कलम ३०२ अंतर्गत कारवाई करावी,अशी मागणी केली आहे. हत्या का झाली?संतोष अण्णा देशमुख यांनी पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागणाऱ्या...