वसई रेल्वे स्थानक परिसरातून एका प्रवाशाचा मोबाईल चोरी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत एका संशयीताला वसई रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक सात येथून ताब्यात घेतले, त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुहेल अबूसमा शेख असे अटक आरोपीचे नाव असून त्याला पुढील कारवाईसाठी जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले आहे.