नालासोपारा रहमतनगर परिसरात वीस वर्ष जुनी अल्फीया नावाची इमारत खचल्याची घटना घडली. अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, महानगरपालिकेत मार्फत अल्फिया आणि शेजारील अशा दोन इमारतीतील नागरिकांना तात्काळ बाहेर काढून इमारती रिकाम्या करून सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अल्फीया इमारतीतून 125 व इमारतीच्या शेजारी असलेल्या सबा या दुसऱ्या इमारतीतून 114 नागरिकांना बाहेर काढून इमारती रिकाम्या करण्यात आल्या. बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था नजीकच्या मदरसा व एका सभागृहात करण्यात आली आहे.