युरिया खत पुरेशा प्रमाणात वेळेवर पुरवले जात नसल्यामुळे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा छळ चालू असल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी ग्रामस्थांनी आज 10 सप्टेंबर रोजी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत थेट तहसील कार्यालयावर धडक दिली. युरिया आणि नुकसान भरपाई मिळाल्या शिवाय माघार घेणार नाही; असा निर्धार करीत संतप्त ग्रामस्थ शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.