12 सप्टेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे जिथे इटारसी रेल्वे पुलाखाली झुडपामध्ये एका बाळाचा मृतदेह बॅगमध्ये आढळला. या परिसरात कोणत्याही प्रकारचे कॅमेरे नसल्याने पोलिसांना आता या प्रकरणाचा तपास करणे आव्हानात्मक ठरले आहे. सदर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. हे कुकृत्य कोणी केले याचा तपास पोलीस करीत आहे.