तालुक्यातील बेलखेडा गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी रवि ठाकुर भुसुम (वय २४, रा. बेलखेडा, ता. अचलपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेच्या जबानीनुसार, तिची मुलगी ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता गावातील राजु साकोम यांच्या घरच्या गणपती विसर्जनाला जाते असे सांगून निघाली होती. मात्र ती परत आली नाही. मुलीचा गावात व नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कुठेही मिळाली नाही. दरम्यान, गावकऱ्यांनी सांगितले की, आरोपी रव