राहुरी तालुक्यातील केंदळ येथील कपाशीच्या पिकात पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. महसूल कर्मचारी पंचनामा करण्यासाठी येत नाही, तहसीलदार आज पाच वाजेपर्यंत माझ्या शेतात आले नाही तर मी विष प्राशन करून आत्महत्या करील असा केंदळ येथील शेतकरी विशाल तारडे यांचा व्हिडिओ केला असुन तो व्हिडिओ आज बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.