Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Oct 2, 2025
खुलताबाद तालुक्यातील आखातवाडा, चिंचोली, पिंप्री, पळसगाव, पळसवाडी, सालुखेडा, सोनखेडा, गोळेगाव आमदार सतीश चव्हाण यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.गेल्या महिनाभरात तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.मागील आठवड्यातील अतिवृष्टीमुळे कापूस, मका, अद्रक, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेली.अनेक ठिकाणी विहिरी ढासळल्या तर शेती जमीन वाहून गेली आहे.एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे चव्हणांनी स्पष्ट केले