गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, यांनी गोरेगाव शहरातील ठाणा चौक आणि इतर ठिकाणी गणरायाचे आशीर्वाद घेतले.गणेशोत्सवासारख्या सणांमुळे समाजातील श्रद्धा, एकात्मता आणि आपुलकीची नाळ अधिक दृढ होत असून, लोकसेवेच्या कार्याला नवी ऊर्जा लाभते.ही ऊर्जा नेहमी बाप्पा मनात कायम ठेवो अशी कामना त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी गोरेगाव नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, संजय बारेवार,भाजपा तालुकाध्यक्ष अनंत ठाकरे राजा कटरे,नमन जैन,विकास बारेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.