लोहारा शहरातील मुख्य चौकांमध्ये रहदारीस धोकादायक ठरेल आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांवर लोहारा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. विठ्ठल पोद्दार व गुरव यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती लोहारा पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी सहा वाजता दिली.