एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता अजिंठा चौफुली येथील हायवे टॉवरमधील 'जळगाव ऑटो सर्व्हिसेस' या दुकानात केलेल्या कारवाईत महिंद्रा कंपनीच्या बनावट आणि नकली स्पेअरपार्टचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजता दोन दुकानदारांविरुद्ध कॉपीराईट कायद्यानुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे बनावट वस्तूंच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.