हिंगोली तालुक्यातील श्री क्षेत्र नरसी नामदेव येथे आज दिनांक 8 जानेवारी रोजी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, या रक्तदान शिबिराला स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या रक्तदान शिबिराला सकाळी 11 वाजता हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले आहे यावेळी अनेक रक्तदाते उपस्थित होते.