संजय राऊत यांच्या टीकेला आज बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत संजय राऊत हे सतत डंका वाजवत होते की “एनडीए आणि यूपीए मध्ये फक्त ४० मतांचा फरक आहे. कालपर्यंत हीच त्यांची भाषा होती. पण निकालानंतर काय दिसलं? जवळपास दीडशे मतांचा प्रचंड फरक! एवढा प्रचंड फरक पडताना तुम्ही डोळे मिटून बसलात का? यातली सगळ्यात मोठी गंमत म्हणजे तुमच्याच खासदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही.