अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये डेंगूमुक्त अभियान सुरू असून १४ आठवड्यांमध्ये १५,४१८ घरांची तपासणी केली आहे. तसेच ४०,९२७ पाणी साठे तपासले आहेत. यामध्ये ६३७ पाणी साठ्यामध्ये अळ्या आढळल्या असून ते पाणी साठे नष्ट करण्यात आले आहेत. या परिसरामध्ये औषध फवारणी व नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली आहे. मागील वर्षी सप्टेंबरपर्यंत ५४ डेंगूचे रुग्ण शहरामध्ये आढळले होते. यावर्षी १० रुग्ण आढळले असून डेंगूमुक्त अभियान नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचले असल्यामुळे जनजागृती झाली आहे.