कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू प्रो. हरे राम त्रिपाठी यांचा मऊ कुशीनगर उ. प्र. येथे जात असताना शनिवार दि. 23 ऑगस्टला पहाटे 6 वाजताच्या दरम्यान पो.स्टे.गौरीघाट अंतर्गत गोपागंज येथे एका रस्त्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी श्री बदामी त्रिपाठी यांचा ही दुर्दैवी अंत झाला. तसेच चालक वैभव मिश्रा हा गंभीरपणे जखमी असून तो रुग्णालयात आहे. या घटनेने संस्कृत विवि रामटेक वर वज्राघात झाला असून ही घटना परिवारासाठी ही धक्कादायक आहे.