उजनी आणि नीरा धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान या स्थितीची आमदार समाधान आवताडे यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी भीमा नदीतील विसर्ग आता कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आज गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता पंढरपूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.