हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत कार्यालयात भटके विमुक्त जातीसाठी महत्वाचा दिवस मानल्या जाणाऱ्या भटके विमुक्ती दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.या कार्यक्रमाला भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद दांडगे, उपाध्यक्ष गजाननजी चिडे, माजी सरपंच दिलीपराव राऊत, माजी उपसरपंच भास्करजी बुरंगे व पोलीस पाटील स्वेताबाई लोंढे, ग्रामपंचायत कर्मचारी रामदासजी भोयर,आदी उपस्थित होते.