ग्रामसभा सुरू असताना ग्रामसभेमध्ये काही जणांनी अचानकपणे ग्रामसेवक व उपसरपंच यांच्यावर हल्ला चढवून त्यांच्या तोंडाला काळे ऑइल लावून शिवीगाळ करून ग्रामसभेकरिता आणलेले दस्तऐवज फाडून फेकल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील पिंपरी पांढूर्णा येथे 25 ऑगस्ट ला घडली.याप्रकरणी ग्रामसेवक रमेश मुंडवाईक यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अनिकेत आडे सह चौघाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.