सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये ॲम्पी थिएटर बांधकामाचा शुभारंभ सोमवारी, सकाळी ११ वा. करण्यात आला. या कामासाठीचा निधी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला असून, यासाठी माजी पालकमंत्री व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मार्गदर्शन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा पुढाकार लाभला आहे.