सोशल मीडियातून झालेल्या ओळखीतून एका तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी एका ३२ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.