हिंगोली हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या गोर सेनेच्या वतीने आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात असल्याची पुरावा असून हैदराबाद गॅझेट तात्काळ लागू करावा व बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.