संगमनेर तालुक्यातील गावांना लवकरच मोबाईल नेटवर्कचा दिलासा संगमनेर तालुक्यातील बोटा, कुंभारवाडी, पोखरी बाळेश्वर, वनकुटे, पिंपळगाव माथा, भोजदरी, धुमाळवाडी व डोळासणे या गावांमध्ये विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना मोबाईल नेटवर्कच्या गैरसोयीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम आणि ई-पीक पाहणीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरावर मर्यादा येत होत्या.