आमगाव पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने मोठी कारवाई करीत पंधरा मोटारसायकलींसह १४ लाख ९५ हजार रूपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील मोटारसायकल चोरी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पोलीस निरीक्षक तिरुपती अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान पोलीस पथकाने कवडी, वडद, तिगाव, बघेडा (मांडोदेवी परिसर) तस