स्थानिक एमआयडीसीतील बीएसके इंडस्ट्रीजमध्ये छतावर काम करीत असताना २० फूट उंचीवरून खाली पडून राजेश पटेल ३२, बुटीबोरी या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त कामगारांनी मृतक कामगाराचे शव कंपनीच्या गेटसमोर ठेवून आर्थिक मदतीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.मूळचा रिवा (मध्यप्रदेश) येथील रहिवासी मृतक राजेश हा बीएसके इंडस्ट्रीजमधील सिमेंटच्या टिना बसविण्यासाठी आला होता. त्याला कुठलाही अनुभव नव्हता.