नागपूर येथील दीक्षाभूमी ते मुंबई येथील चैत्यभूमी अशी निघालेल्या धम्म ध्वज जनसंवाद यात्रेचे वैराग शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. भंते विनयचार्य यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही यात्रा 'महाबोधी महाविहार मुक्त करा' आणि 'बीटी ॲक्ट १९४९ रद्द करा' या प्रमुख मागण्यांसाठी आहे. सोमवारी दुपारी १ वाजता ही यात्रा वैराग शहरातील सिद्धार्थ नगर येथे पोहोचली. स्थानिक बौद्ध बांधवांनी पुष्पवृष्टी करून आणि मोठ्या उत्साहात यात्रेचे स्वागत केले.